लग्न व कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी योग्य वकील निवडणे का गरजेचे आहे? – आणि Patole & Co. (The Law Firm) तुमच्यासाठी काय करते
लग्न ही केवळ दोन व्यक्तींमधील नाती जोडणारी गोष्ट नसून, ती अनेक वेळा कायदेशीरदृष्ट्या गुंतागुंतीचीही ठरू शकते. तलाक, मेंटेनन्स, मुलांची कस्टडी, कौटुंबिक हिंसाचार किंवा मालमत्तेवरील हक्क – या सर्व गोष्टींमध्ये एक चुकलेला निर्णय तुमच्या आयुष्यावर खोल परिणाम करू शकतो. खंत याची असते की, अनेक लोक अशा महत्वाच्या निर्णयासाठी योग्य वकील निवडण्यात चूक करतात . सामान्यतः लोक अशा वकिलांकडे जातात जे कोणतेही प्रकरण हाताळतात – पण फॅमिली लॉ ही एक विशेष शाखा आहे , जिचा अभ्यास आणि अनुभव दोन्ही महत्त्वाचे असतात. या ब्लॉगमध्ये आपण पाहूया की योग्य वकील का आवश्यक आहे आणि Patole & Co. कसा तुम्हाला फॅमिली लॉमध्ये विशेष कौशल्य असलेल्या अनुभवी वकिलांशी जोडतो. ⚖️ प्रत्येक वकील कौटुंबिक कायद्यात तज्ज्ञ नसतो जसं हृदयविकारासाठी आपण स्किन स्पेशालिस्टकडे जात नाही, तसंच तलाक किंवा कौटुंबिक वादांसाठी तुम्हाला फक्त त्या विषयात तज्ञ वकिलाची गरज असते . फॅमिली लॉमध्ये खालील बाबी येतात: घटस्फोट (म्युच्युअल किंवा कॉन्टेस्टेड) मेंटेनन्स आणि अॅलिमनी मुलांची कस्टडी कौटुंबिक हिंसाचार घटस्फोटानंतर ...